Ad will apear here
Next
लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
पुणे : ‘तिसरा लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान लोणावळा येथील ‘ट्रीओसे प्लाझा’ येथे आयोजित करण्यात आला आहे. अल्ट्रा मिडिया आणि एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुशीलकुमार अगरवाल हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून, माधव तोडी हे या महोत्सवाचे संचालक आणि विवेक वासवानी हे या महोत्सवाचे प्रमुख आहेत. १८ चित्रपट, दोन कुशल चित्रपट निर्मात्यांच्या चर्चासत्रासह तीन कार्यशाळा ही या महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत’, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. 

‘भारतीय चित्रपटसृष्टीत बहुमोल योगदान देणारे प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या सुजाता, बंदिनी, मधुमती आदी सहा चित्रपटांचे आणि त्यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण होणार आहे. मराठीतील न्यूड, कच्चा लिंबू, डॉ. रखमाबाई  हे चित्रपट दाखविण्यात येणार असून, दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी त्यांचे लक्षणीय चित्रपट ‘लाईफ इज गुड’ आणि ‘डॉ. रखमाबाई’ यांवर संवादात्मक चर्चा होणार आहे. दिग्दर्शक आणि निर्माते विवेक वासवानी प्रसारमाध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणार आहेत. खास लोकाग्रहास्तव ‘रफ बुक’ हा त्यांचा चित्रपट या वेळी पुन्हा दाखविण्यात येणार असून, ‘इव्हिनिंग शॅडोज’, ‘द जीनियस-रामानुजन’ आणि ‘द स्टोलन प्रिन्सेस’ हे चित्रपटही दाखविण्यात येतील. महोत्सवाची नांदी म्हणून बिमल रॉय यांच्या चित्रपटाची पोस्टर्स, छायाचित्रे,  स्मृतिचिन्हे आणि वस्तूंचे प्रदर्शन एक  सप्टेंबरपासून ‘ट्रीओसे प्लाझा’ येथे सुरु होणार आहे. त्यांच्या कन्येने त्यांच्यावर लिहिलेली आणि संपादन केलेली पुस्तकेही  येथे सवलतीच्या किंमतीत विक्रीस उपलब्ध असणार आहेत’, असेही आयोजकांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZLKBR
Similar Posts
‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल मुंबई : इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) ‘अॅस्पिरेशन २०२२’ या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत लोणावळ्यातील प्रवेशाची घोषणा केली आहे. कंपनीने काकडे समूहाचा भाग असलेल्या वाइल्ड्स अॅंड वॉटर डेव्हलपर्ससोबत व्यवस्थापन कंत्राटाच्या माध्यमातून ताजचे नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी करार केला आहे.
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता मुंबई : भारतभरात प्रचंड लोकप्रिय असलेला ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ या साहसी उपक्रमाचा १५०वा खेळ लोणावळ्यात नुकताच पार पडला. यात ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारची महिंद्राची एकूण ६० वाहने सहभागी झाली होती. मुंबई, पुणे, नाशिक व परिसरातील ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना या साहसी खेळाचा आनंद लुटला
नवले महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. हे शिबिर मावळ तालुक्यातील गोवित्री ग्रामपंचायत येथे झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language